खामगाव : सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटर, जलंब रोड, खामगाव तर्फे “श्री संत गजानन महाराज” यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सेवार्थ आकस्मिक कक्ष व प्रथमोपचार केंद्र यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले.दि. ३१ जुलै २०२५ रोजी हजारो भाविकांनी पायी वारी करत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. लासुरा फाटा येथे हॉस्पिटलच्या वतीने हे केंद्र उभारण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी हे केंद्र कार्यरत ठेवण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात “श्री”च्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. यावेळी डॉ. गौरव लढ्ढा, डॉ. निलेश टीबडेवाल, डॉ. सौ. मंजुष्री टीबडेवाल, डॉ. गणेश महाले, डॉ. गौरव गोयंका, डॉ. आनंद राठी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आर. एम. ओ. डॉ. यशोधरा, डॉ. श्रुती काळे, सिस्टर सुरेखा चव्हाण, वॉर्डबॉय गोपाल वाशिमकर यांचाही मोलाचा सहभाग होता.हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. यशस्वी आयोजनासाठी नकुल साबळे व सुपरवायझर राजेश साठे यांनी विशेष मेहनत घेतली. हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी निलेश बैरागी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
पालखी सोहळ्यात सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे सेवेसाठी आकस्मिक कक्ष व प्रथमोपचार केंद्र
RELATED ARTICLES