बुलढाणा, दि. ९ (जिमाका) – जिल्ह्यातील वाळू माफियांवर आता सरकारची थेट नजर, आणि कारवाईसाठी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे स्वतः पुढे सरसावले आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महसूल विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी थेट आदेश दिले –“अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करा, कोणालाही सोडू नका!”कडक इशारा –मंत्री, खासदार किंवा आमदारांच्या शिफारशींवरूनही वाळू माफियांना मोकळं करू नकावाळू तस्करीत सामील महसूल अधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवाजिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनीच कडक कारवाईची जबाबदारी घ्यावीया बैठकीला कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.वाळू साठ्यांचा ‘रि-सर्व्हे’मंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व वाळू साठे आणि घाटांचे पुन्हा सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी एमआरसॅक यंत्रणेचा वापर करून पाहणी करावी, तसेच नवीन वाळू धोरणानुसार कारवाई करावी. गरीब आणि सर्वसामान्यांना घरकुलासाठी वाळू सहज मिळावी, यावरही त्यांनी भर दिला.इतर कठोर निर्देशअवैध वाळू वाहतूकदारांकडील प्रलंबित दंड वसूल करागायरान जमिनीवरील घरांच्या प्रकरणांचा निकाल लावाशासकीय जमिनी बळकावणाऱ्यांवर कारवाई करागावनिहाय नकाशे तयार करून प्रमुख ठिकाणी लावालोकअदालतीद्वारे तक्रारींचा निपटारा कराई-चावडी आणि जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा लवकर पूर्ण कराबैठकीदरम्यान महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. बैठकीच्या शेवटी महसूल मंत्र्यांनी ई-चावडी आणि जिवंत सातबारा मोहिमेचं विशेष कौतुक केलं.
वाळू माफियांना थेट एमपीडीएचा फटका? महसूल मंत्री ॲक्शन मोडवर!
RELATED ARTICLES