जय गजानन मित्र मंडळ तर्फे हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण खामगाव : श्री संत गजानन महाराज… महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान!शेगाव येथील संत नगरीत वसलेलं श्री गजानन महाराजांचं समाधी स्थळ आणि भव्य मंदिर हे भक्तांचं आध्यात्मिक केंद्र बनलं आहे. इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या भक्तीचा अनुभव घेतात.या गजानन भक्तीचेच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जय गजानन मित्र मंडळ, टॉवर चौक, खामगाव.गेल्या २५ वर्षांपासून, या मंडळाचं एक विशिष्ट आणि सेवाभावी कार्य न थकता सुरू आहे.दरवर्षी पंढरपूर आषाढी एकादशी नंतर, श्री गजानन महाराजांची पालखी जेव्हा खामगावमध्ये परत येते,तेव्हा हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात… आणि या भाविकांना मंडळाच्या वतीने मोफत महाप्रसाद वाटप केला जातो.फक्त वर्षातून एकदाच नव्हे, तर प्रत्येक गुरुवारी, टॉवर चौक येथे, मंडळाच्या सदस्यांकडून भाविकांसाठी गुरुवार निमित्त महाप्रसादाचं वितरण केलं जातं.हा उपक्रम गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अविरतपणे सुरू आहे, आणि त्यातून गजानन भक्तीचा जिवंत अनुभव शहरवासीयांना मिळतो आहे.मंडळाचं हे कार्य केवळ सेवा म्हणून नव्हे, तर एक भक्तीपर परंपरा म्हणूनही पाहिलं जातं… आणि शहरात याचं मोठं कौतुक आणि सन्मान केल्या जातो.श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि मंडळाच्या भक्तीभावनेने प्रेरित होऊन, ही परंपरा पुढेही असाच वाढत राहो, हीच भावना सर्वांच्या मनात आहे. या उपक्रमासाठी जय गजानन मित्र मंडळाचे विजय वानखडे, चरणसिंह चौहान, गजानन चव्हाण, महादेव गावंडे, अनिल झांबड, दीपक यादव, जितेंद्रसिंह मेहरा, सोनू तायडे, दिनेश जोहारले, राजेश बुंदे, गजानन बर्गे, गोकुळ कटकवार, दत्तात्रय काळुसे, श्रीधर ढगे, सुनील कदम, पप्पू पाटील, प्रवीण मेहसरे सचिन शर्मा, अयुब शेख, अरमान खान, पिंटू मिरगे, मनोज कडे यांच्या सर्व यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले..
जय गजानन मित्र मंडळ तर्फे हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण
RELATED ARTICLES