खामगाव: स्थानिक वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगांव द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम ही दिनांक 11/08/2025 रोजी यशस्वी संपन्न. या मोहिमेसाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. सागरभाऊ फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा आणि राष्ट्रीय एकतेची भावना दृढ निर्माण व्हावी या उद्देशाखाली महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविल्या जातात. त्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त सुरू असलेल्या ‘ हर घर तिरंगा ’ ही मोहीम आमच्या सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची रॅली काढून व आजूबाजूच्या परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी व तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे यांनी या मोहिमेनिमित्त संबोधित करत असताना असे उद्गार काढले की, ही मोहीम आपल्या केवळ देशप्रेम शिकवत नाही, तर त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीवही करून देते. या मोहिमेमध्ये सर्व विद्यार्थी वर्ग तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन महाविद्यालयाच्या आजूबाजूचा परिसरात तिरंग्याच्या लहरी पसरल्या आहेत.या कार्यक्रमाचे यशस्वी संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर सोनोने, प्रा त्रिशुल भारसाकळे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. माधुरी क्षीरसागर यांनी अथक परिश्रम घेतले. ही मोहीम यशस्वी संपन्न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री सागर भाऊ पुंडकर व संस्थेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अँड. आकाशभाऊ फुंडकर यांनी शुभेच्छा दिल्या.
सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव येथे ‘ हर घर तिरंगा ’ मोहीम यशस्वी
RELATED ARTICLES