24.2 C
New Delhi
Sunday, March 1, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याशेगांव शहरातील नागरी सुविधांसाठी स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे मैदानात; आमरण उपोषणाची...

शेगांव शहरातील नागरी सुविधांसाठी स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे मैदानात; आमरण उपोषणाची सूचना

शेगांव : शहरातील नागरी सुविधा आणि नागरिकांच्या समस्या याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष सुरूच असल्याने स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे स्वराज्य पक्ष मैदानात उतरले आहेत. ५ ऑक्टोंबर नंतर कोणत्याही क्षणी ते आमरण उपोषण करू शकतात, असे निवेदनाद्वारे त्यांनी कळवले आहे.शहरातील परिस्थिती अत्यंत विधारक स्वरूपाची आहे. नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. नगरपरिषदेच्या स्वच्छता सर्वेक्षणात अमरावती विभागातून चांगले गुण मिळाले असून शहराला मानांकन मिळाले, तरी प्रत्यक्षात नागरी सुविधांचा अभाव जाणवतो आहे.

नागरी समस्यांमध्ये समाविष्ट आहेत:

1. शहरात स्वच्छतागृह आणि मुतारी व्यवस्था सुधारावी.

2. शहरातील घाण, कचरा व नालीची साफसफाई करावी.

3. खड्डे भरून रस्ते दुरुस्त करावे.

4. शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा सुनिश्चित करावा.

5. शहरातील महापुरुषांच्या चौकाची दुरुस्ती, रंगरोगोटी, सफाई व विद्युत रोषणाई करावी.

6. सांडपाणी चेंबरसाठी खोदलेल्या स्त्यांची दुरुस्ती करावी.

7. भटक्या जनावरांसाठी योग्य व्यवस्था करावी.

8. मातंगपुरी पुनर्वसित तसेच मंदिर परिसरातील दुकानदारांना कायमची जागा आणि शॉप ॲक्ट लायसन्स मिळावी; अतिक्रमण रोखावे.

9. शहरातील जुने कॅमेरे काढून नवीन सीसीटीव्ही लावावेत.

10. पथदिव्यांची सुरळीत कामगिरी सुनिश्चित करावी.

गोपाल तायडे यांच्या मते, नगरपरिषदेच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या समस्यांकरीता स्वराज्य पक्ष मैदानात उतरून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेची राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments