शेगाव | श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे वर्ष १२५ वा पुण्यतिथी उत्सव २०२५ उत्साहात साजरा केला जाणार आहे. २४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात २४ ऑगस्ट रोजी (भाद्रपद शुद्ध प्रतिपदा) श्री. ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे यांच्या कीर्तनाने होईल. पुढील दिवसांत सुप्रसिद्ध कीर्तनकार भरत बुवा जोगी, प्रशांत बुवा नातोणे, भरत बुवा पाटील आणि चांगू बुवा गिरसावळकर यांची कीर्तने होणार आहेत.
२८ ऑगस्ट रोजी (भाद्रपद शुद्ध पाचमी) सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री. ह.भ.प. भरत बुवा पाटील यांचे “श्रींचे समाधी सोहळ्या निमित्त” विशेष कीर्तन होईल. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवात श्री गणेशयाग व वरुणयाग २४ ऑगस्टपासून सुरू होऊन २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता यागाचा पुण्याहुती सोहळा व भव्य पालखी परिक्रमा पार पडणार आहे.
तसेच २९ ऑगस्ट रोजी (भाद्रपद शुद्ध षष्ठी) सकाळी ६ वाजता ह.भ.प. प्रमोद बुवा राठोड यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी व गोपालकाला सोहळा पार पडेल.
संस्थानने सर्व भक्तांना या पावन सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.