24.2 C
New Delhi
Sunday, March 1, 2026
spot_img
Homeराजकारणराहुल गांधींचा दमदार मोर्चा; देशाला दाखवली सक्षम नेतृत्वाची झलक – मोदींनी आता...

राहुल गांधींचा दमदार मोर्चा; देशाला दाखवली सक्षम नेतृत्वाची झलक – मोदींनी आता उत्तरं दिली पाहिजेत!

नवी दिल्ली, : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चाने आज राजधानीत प्रचंड प्रभाव निर्माण केला. सुमारे 300 खासदारांसह निघालेल्या या मोर्चातून राहुल गांधींनी देशाला दाखवून दिले की ते एक सक्षम आणि लढाऊ नेता आहेत, जे लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहत नाहीत.हा मोर्चा संसद भवनातून भारत निवडणूक आयोग (ECI) मुख्यालयापर्यंत काढण्यात आला. बिहारमधील मतदार यादीतील विशेष तीव्र पुनरावलोकन (SIR) आणि कथित निवडणूक गैरप्रकारांच्या विरोधात हा निर्धारपूर्ण लढा उभारण्यात आला होता.आघाडीने सत्ताधारी भाजपवर मतदार याद्या फेरफार केल्याचा गंभीर आरोप करत, निवडणूक आयोगाने तातडीने पारदर्शक पावले उचलून डिजिटल मतदार याद्या जाहीर कराव्यात, अशी ठाम मागणी केली.राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील या भव्य मोर्चाने विरोधी पक्षाची ताकद आणि एकजूट देशासमोर आणली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठोस उत्तर देणे गरजेचे असल्याची मागणी विरोधकांनी केली आहे.राहुल गांधी यांनी स्पष्ट संदेश दिला — “ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, आणि आम्ही मागे हटणार नाही!”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments