मुंबई, : महाराष्ट्रातील कामगार विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबर रोजी भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत.
🏢 सर्व कार्यालयांत प्रतिमा पूजन आणि उत्सवाचे आयोजनकामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कार्यालयात भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा स्थापन करून पूजन करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून, हा दिवस उत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
📅 जयंतीला शासकीय सुट्टी असल्यास पुढील कार्यदिवशी कार्यक्रम१७ सप्टेंबर रोजी जर शासकीय सुट्टी असेल, तर संबंधित कार्यालयांनी पुढील कार्यदिवशी जयंती साजरी करावी, असेही स्पष्ट निर्देश ॲड. फुंडकर यांनी दिले आहेत.-
✍️ कामगार क्षेत्रातील योगदानास मान्यता
भगवान विश्वकर्मा हे कारागीरांचे आणि तंत्रज्ञांचे दैवत मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त अशा उपक्रमातून कामगार वर्गाच्या कार्याची आणि योगदानाची मान्यता दिली जात आहे.–#VishwakarmaJayanti #LabourMinistry #Aad.akashPhundkar #GovernmentCircular #MaharashtraNews #कामगारविभाग #विश्वकर्माजयंती #शासकीयआदेश