खामगाव तालुक्यातील लेकुरवाळी टेकडी येथे सृष्टीमंगलम् संस्थेच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने येथे झाडांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
या अनोख्या कार्यक्रमात महिलांनी, लहान मुलांनी व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. झाडांना राखी बांधतांना सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याची आणि वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.
सृष्टीमंगलम् संस्थेचे कार्यकर्ते सांगतात की, “बंधू-भगिनीच्या नात्याप्रमाणेच आपलं नातं निसर्गाशी असलं पाहिजे. झाडे आपल्याला जीवदान देतात, त्यामुळे त्यांचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे.”
या उपक्रमामुळे लेकुरवाळी टेकडीवरील हिरवाई वाचवण्याच्या मोहिमेला नवी ऊर्जा मिळाली असून, रक्षाबंधनाला पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा एक नवीन आयाम प्राप्त झाला आहे. या उपक्रमात दिनेश उखळकर राजेश शर्मा उमेश खेडकर,संदिप फंदाट,विजय खंडागळे,वैभव कारंजकर,लाध्यापक संजय गुरव,गौरव इंगळे,गणेश कोकाटे,संतोष डवले आदी सहभागी झाले.