यंदाच्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गणेशभक्तांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर या दरम्यान दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.गाडी क्रमांक ०११११ विशेष, दिनांक २६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता नागपूरला पोहोचेल.तर गाडी क्रमांक ०१११२ विशेष, दिनांक २६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जलगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुरटीजापूर, बडनेरा, धामणगाव अशा प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत.या गाड्यांमध्ये एक वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान आणि सात सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी दोन दिव्यांग अनुकूल डबे व दोन लगेज ब्रेक व्हॅन उपलब्ध असतील.तिकिट बुकिंग बुकींग युटिलिटी प्रकल्पांद्वारे, वेबसाइट, मोबाइल अॅप, तसेच एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
गणेशभक्तांच्या सोयीसाठी मुंबई ते नागपूर या दरम्यान दोन विशेष गाड्या
RELATED ARTICLES